Pune : स्मार्ट चोरट्यांनी तरूणाला अडवले, व्दारे करून घेतले 3000 रूपये ट्रान्सफर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकर स्मार्ट म्हंटल्यानंतर पुण्यातले गुन्हेगार तरी मागे कसे राहतील अशीच म्हणायची वेळ सर्व सामान्य माणसाला आली असून, दुचाकीस्वार तरुणाला अडविल्यानंतर त्याच्याकडे काही न मिळाल्याने तिघांनी गुगलपेद्वारे तीन हजार ट्रान्सफर करून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गुन्हेगार टेक्नोसॅव्ही झाले असे म्हणावे लागत आहे. धायरीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी केतन श्रीकृष्ण पाटील (वय ३२, रा. धायरी ) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. डीएसके विश्वमध्ये राहण्यास आहेत. तीन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ते दुचाकीवरुन मित्रांच्या घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून दुचाकीची चावी काढून घेतली. दुचाकी फोडण्याची धमकी देउन गुगल पेवरुन जबरदस्तीने ३ हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. केतन कामामध्ये व्यस्त असल्यामुळे फिर्याद उशीरा दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान शहरात शस्त्राचा धाक दाखवून लुटमार केल्याच्या घटना घडत आहेत. पण अनेकवेळा या चोरट्यांच्या हाती काही लागत नसल्याचे दिसते. सध्या ऑनलाइन व्यवहार होऊ लागले आहेत. यामुळे नागरीक अपचा वापर करतात. त्यामुळे चोरटे देखील तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे यावरून दिसत आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सतीश उमरे करीत आहेत.