Pune Solapur Demu-Manjari Railway Station | पुणे-सोलापूर डेमू मांजरी स्थानकावर थांबणार, रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या मागण्यांना हिरवा कंदील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Solapur Demu-Manjari Railway Station | पुणे-सोलापूर डेमूला मांजरी येथे थांबा मिळावा, दौंड (Daund Railway Station) हे पुणे शहराचे उपनगर म्हणून कार्यान्वित करावे तसेच हडपसर (Hadapsar Railway Station) स्थानकातील हैदराबाद एक्सप्रेसचा (Hyderabad Express) थांबा तीन ऐवजी एक नंबर प्लॅटफॉर्मवर आणावा यासह केलेल्या अनेक मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. मध्य रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीची (ZRUCC) नुकतीच मुंबईत बैठक झाली. याबैठकीत झालेल्या चर्चेची माहिती समितीचे सदस्य अ‍ॅड. कृपाल पलूसकर (Adv Krupal Paluskar) यांनी दिली. (Pune Solapur Demu-Manjari Railway Station)

अ‍ॅड. कृपाल पलूसकर म्हणाले, सध्या पुणे-सोलापुर डेमूला मांजरी स्थानकावर थांबा नाही. तीला थांबा मिळावा, दौंड-पुणे आणि पुणे-सातारा लोकलची वारंवारिता कमी असल्याने विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक यांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील गाड्यांची वारंवारिता वाढवण्यात यावी. तसेच हडपसर स्थानकात हैदराबाद एक्सप्रेस गाडीचा प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आहे. मात्र तो गर्भवती महिला, दिव्यांग, वयोवृद्ध ज्येष्ठ प्रवाशांना हा प्लॅटफॉर्म सोयीस्कर नाही. त्यामुळे हा थांबा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर द्यावा. याशिवाय दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून कार्यान्वीत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. (Pune Solapur Demu-Manjari Railway Station)

रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या सर्व मागण्यांना हिरवा कंदील देण्यात आला असल्याचे अ‍ॅड. पलूसकर यांनी सांगितले. त्यामुळे पुणे-सोलापूर डेमू मांजरी स्थानकावर थांबणार असून येत्या तीन ते चार महिन्यात हा थांबा कार्यान्वीत होणार आहे. तसेच हडपसर स्थानकाचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत सकारात्मक विचार व परीक्षण करुन निर्णय घेतला आहे.

येत्या काही महिन्यात दुहेरी मार्ग झाल्यानंतर लोकलची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
तर दौंड पुणे शहराचे उपनगर म्हणून कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असून
लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे अ‍ॅड. पलूसकर यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Drowning In Bhima River | पुण्यातील दुर्दैवी घटना ! गुऱ्हाळावर काम करणाऱ्या 3 परप्रांतिय मुलांचा भीमी नदीत बुडून मृत्यू