Pune : मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन   मार्केटयार्ड परिसरात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने आता येथील गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक काही प्रमाणात बदल केला आहे.

मार्केटयार्ड भागात किरकोळ विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यानंतर पोलीस व येथील प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी किरकोळ विक्री थेट बंद केली. तर रस्त्यावरील स्टॉल देखील बंद करण्यात आले होते. तसेच ठोक व्यापार सुरू आहे. मात्र यानंतरही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे रस्ते जाम होत आहेत. त्या अनुषंगाने वाहतूक विभागाने आता येथील वाहतुकीत बदल करत येथील वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात 14 दिवसांचे बदल करण्यात आले आहेत. हे बदल 16 मेच्या मध्यरात्री 12 पासून ते 1 जूनपर्यंत या असणार आहेत. या कालावधीत फक्त अत्यावश्यक वाहनांना परवानगी असेल.

बदल असे आहेत…

वखार महामंडळ चौक ते मार्केटयार्ड (उत्सव चौक) हा दोन्ही बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे.

ठोक बाजार सुरू असल्याने मार्केटयार्डमध्ये येणाऱ्या वाहनांना केळी बाजार गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे. तर बाहेर पडताना मेनगेटमधून बाहेर पडायचे व डावीकडे वखार चौक किंवा उजवीकडे वळून मार्केटयार्ड (उत्सव चौक) इकडे वळून इच्छितस्थळी जायचे आहे.