महात्मा गांधींचा देखावा करुन एक लाखांचे बक्षीस मिळवा !

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

महात्मा गांधी यांचे विचार देखाव्यातून, व्याख्यानातून, तसेच इतर नाविन्यपूर्ण गोष्टी करुन पुढे नेणाऱ्या गणेश मंडळांसाठी अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मंडळाला एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

महात्मा गांधी यांच्या जन्माचे हे 150 वे वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजिक करण्यात आलेल्या स्पर्थेसाठी काहि निकष ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रथम पारितोषीकासाठी मंडळाची निवड करण्यात येणार आहे. नाविन्य, परिणामकारकता, काळानुरुप योग्य संदेश, एेतिहासिक अचूकता हे स्पर्धेसाठी निकष असणार आहेत. आजच्या संदर्भात महात्मा गांधी यांचा कोणता राष्ट्रीय विचार, कोणत्या प्रसंगातून अधोरेखित करणे आवश्यक आहे याची निवड हा पारितोषीकासाठी महत्वाचा निकष असणार अाहे. असे डाॅ. कुमार सप्तषी यांनी सांगितले आहे.

पारितोषिक निवड समितीद्वारे स्पर्धेचे परिक्षण करुन निकाल जाहिर करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर पुढील 15 दिवसांत पारितोषिक जाहिर करण्यात येइल. त्यानंतर एका महिन्याच्या आत पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुक गणेश मंडळांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडे अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

अमिताभ बच्चन यांची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत
जाहिरात

 

[amazon_link asins=’B074G3TJYF,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9be53bdd-b35a-11e8-83eb-8516100450f5′]