Pune Swargate Crime | स्वारगेट परिसरातून प्रवाशाचा मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swargate Crime | ओला कॅब बुक करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जबरदस्तीने मोबाईल हिसकावून (Mobile Theft) नेल्याची घटना स्वारगेट एसटी स्टँड (Swargate ST Stand) परिसरात घडली आहे (Robbery Case). ही घटना शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत संतोष सुभाष कुलकर्णी (वय-36 रा. स्वामी समर्थ मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट जि. सोलापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अक्कलकोट येथून स्वारगेट एस्टी स्टँड येथे आले. सिंहगड रोड येथील नातेवाईकाकडे जाण्यासाठी ते स्वारगेट एसटी स्टँड बाहेर आले. त्यांनी ओला कॅब बुक करण्यासाठी खिशातील मोबाईल काढला. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.(Pune Swargate Crime)

खिडकीची काच फोडून कॅमेऱ्याची चोरी

हडपसर : बंद घराच्या खिडकीची काच फोडून चोरट्याने घरातील पंधरा हजार रुपये किंमतीचा कॅनॉन कंपनीचा कॅमेरा चोरुन नेला. हा प्रकार हडपसर परिसरातील इंद्रप्रस्थ फेज-2 येथील चिंतामनी बंगल्यात गुरुवारी (दि.14) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत नंदकिशोर दत्तात्रय गोसावी (वय-59 रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 454, 457,380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्य़ाद यांची बहिण बुधवारी घराला कुलुप लावून बाहेर गेली होती.
त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची काच तोडून घरात प्रवेश केला.
घरातील पंधरा हजार रुपये किंमतीचा कॅनॉन कंपनीचा कॅमेरा चोरुन नेला.
फिर्य़ादी गुरुवारी रात्री बहिणीच्या घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी हडपसर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kondhwa Crime | किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी वस्तूने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Shivsena UBT Leader Ambadas Danve | उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?, नाराज अंबादास दानवे यांनी स्वत: केला खुलासा, ”एकनाथ शिंदेंबरोबर…”

Pune Hadapsar Crime | पुणे : आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण, सोलापूर येथे नेऊन लुटले

पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक