Pune Swargate Crime | पुणे : खोटा सोन्याचा हार देऊन सहा लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swargate Crime | पुणे शहरामध्ये खोटे सोने देऊन आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना ससून रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. अशीच एक घटना सारसबाग (Sarasbaug) जवळ बुधवारी (दि.13) साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आरोपीने खोटा सोन्याचा हार देऊन सहा लाखांची फसवणूक केली.(Pune Swargate Crime)

याबाबत खिलारेवाडी, कर्वेरोड येथे राहणाऱ्या 41 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) शुक्रवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरून राजू प्रतापती व त्याच्यासोबत असलेल्या महिलेविरुद्ध आयपीसी 420, 40 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास संपादन करुन स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले.

आरोपी राजु प्रतापती याने फिर्यादी यांच्या पतीला सारसबाग जवळ असलेल्या खंडोबा मंदीराजवळ बोलावून घेतले.
आरोपीसोबत असलेल्या महिलेने फिर्यादी यांच्या पतीला खोटा सोन्याचा हार देऊन सहा लाख रुपये घेतले.
त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले. फिर्यादी यांच्या पतीने सोन्याचा हार एका सराफाला दाखवला.
तेव्हा सोन्याचा हार बनावट असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Pune Kondhwa Crime | किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी वस्तूने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Shivsena UBT Leader Ambadas Danve | उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?, नाराज अंबादास दानवे यांनी स्वत: केला खुलासा, ”एकनाथ शिंदेंबरोबर…”

Pune Hadapsar Crime | पुणे : आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण, सोलापूर येथे नेऊन लुटले

पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक