पुणे : सणसवाडीतील कंपनीत अपघात, २ कामगारांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शिरुर तालुक्यातील सणवाडी येथील एका कंपनीत अपघात होऊन दोन कामगरांचा मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी आठच्या सुमारास पिवायएन (PYN) कंपनीत घडली.

राकेशकुमार सिंग, काळुराम साळुंखे अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहे.
[amazon_link asins=’B07417987C,B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e0b68a8-b1d5-11e8-bfe6-9f661c933581′]

आज सकाळी राकेशकुमार आणि काळुराम हे दोघे कंपनीत कामाला आले होते. काम करत असताना कंपनीतील अपघात झाला. यामध्ये राकेशकुमार सिंग याचा जागीच मृत्यू झाला तर काळुराम साळुंखे गंभीर जखमी झाले. साळुंखे यांना शिकरापूर येथील केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे कंपनीतील कामगार वर्गात खळबळ उडाली आहे. कंपनीत काम करणाऱ्या कामगरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा
वाचाळवीर राम कदम यांचे प्रवक्‍ते पद धोक्यात

एव्हीझेड स्पा मधिल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणेला फटकारले 

तरुणाच्या खून प्रकरणात युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला अटक 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी 

मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

जाहिरात