Pune : काळेबोराटेनगर येथील दवाखाना सामान्यांना आधार ठरेल – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काळेबोराटेनगर येथील कै. दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्ट आणि सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या दहा रुपयांमध्ये आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. नगरसेवक प्रमोद नाना भानगीरे यांनी विशेष प्रयत्नातून सुरू केलेला सेवाभावी दवाखाना जनसामान्यांसाठी आधार ठरणार आहे, असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

काळे बोराटे नगरमध्ये सेवाभावी सामाजिक दवाखाण्याचा शुभारंभ माजी खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रियांका कोटवाल, डॉ. रोहित बोरकर, डॉ. शरद कारंडे, डॉ. नम्रता शिंदे, शिवसेनानेते अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, इंतुभाई शेख, योगेश सातव, प्रवीण हिलगे, संतोष जाधव, नाना बारगुळे, पप्पू होले, विशाल वाल्हेकर, लहू शिंदे, विक्रम फुकटे, महिला नेत्या राणीताई फरांडे, बबनराव आंधळे, अण्णा धायांगुडे, अभिजीत बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले की, मागिल अनेक वर्षांपासून नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे जनसामान्यांच्यासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याकडून चालवला जात असून, समाजकरिता काम करणारा शिवसैनिक आहे, कोरोनाबाधितांची संख्या पाहता हडपसरमध्ये जम्बो कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नगरसेवक प्रमोदनाना भानगीरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. सामान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी काळेपडळ येथे अल्पदरात वैद्यकीय उपचार देण्यासाठी दवाखाना सुरू केला आहे. अशाच पद्धतीचा दवाखाना हांडेवाडी आणि उरुळी देवाची येथे सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र.26 मधील शिवसैनिकांनी विशेष प्रयत्न केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.