Pune : येरवडा जेलमधील महिलांच्या खुल्या कारागृहाच्या शेतातील 3 चंदनाच्या झाडांची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात चोऱ्या होत असताना चक्क येरवडा मध्यवर्ती कारागृहातील महिलांच्या खुल्या कारागृह शेतातील 3 चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. विहिरीजवळ असलेली ही झाडे नेण्यात आली असून, या घटनेने कारागृह प्रशासनात चांगलाच गोंधळ उडाला आहे

याप्रकरणी सुधीर गागर्डे (वय 51) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा कारागृह विभाग येथे कृषी पर्यवेक्षक आहेत. दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात महिलांचे खुले कारागृह आहे. याठिकाणी शेती करण्यात येते . महिला शेती करतात. येथे पाण्यासाठी विहीर देखील आहे. दरम्यान या विहिरीजवळ चंदनाची झाडे होती. जवळपास 15 वर्ष ही जुनी झाडे होती. तस पाहिल्यास या ठिकाणी सर्व सामान्य व्यक्तीला येथे येण्यास सक्त मनाई आहे. पण, तरीही 24 व 25 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आत घुसुन ही सव्वा लाख रुपये किंमतीची तीन झाडे घोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कारागृह विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर आता पाहणी करत वरिष्ठांना माहिती देऊन येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पालिस करत आहेत.