Pune ; शुक्रवार पेठेतील गणेश मंदिरामधील दानपेटीतील रोकड चोरटयांकडून लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्या थांबत नसताना आता चोरटयांनी मध्यवस्तीमधील मंदिरातून दानपेट्या आणि दागिने पळविण्याचे सत्र कायम सुरू ठेवल्याचे दिसत असून, शुक्रवार पेठेतील मारुती कोपरा गणेश मंदिरात भाविकांनी दान केलेली दानपेटीतील रोकड चोरटयांनी चोरून नेली आहे. तर आचार्य अत्रे सभागृह येथे असलेल्या मंदिरातील देखील दानपेटीतून पैसे चोरीला गेले आहेत.

याप्रकरणी कौस्तुभ राजेंद्र देशमुख (वय 28) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेत मारुती कोपरा गणेश मंदिर आहे. सध्या कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. दोन दिवसांपूर्वी चोरट्यानी मंदिराच्या शटरच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील लोखंडी दानपेटीचे झाकण उघडून भक्तांनी दान केलेले आठशे रुपये चोरून नेले. तर याकलावधीत सुभाषनगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे असलेल्या मंदिरातील देखील दानपेटीतून पैसे चोरीला गेले आहेत. सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

यासोबतच घरफोड्या देखील थांबत नसून, पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात चोरी झाली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी या स्वारगेट येथील नवीन पाटबंधारे वसाहतीत कंपाउंडच्या इथे जलविद्युत संच उपविभागीय कार्यलय आहे. दैनंदिन काम केल्यानंतर ते कार्यालय बंद करून गेले होते. त्यानंतर या दोघांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, आतील लेखा शाखा व तांत्रीक शाखा यामधील कॅम्प्युटर तसेच इतर साहित्य असा 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.