Pune : कोरोना महामारीमध्ये तृतियपंथियांवरही उपासमारीची वेळ- प्रेमा

पुणे : मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे व्यवसाय, कंपन्या आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे हजारोंच्य हाताला काम नाही, दाम नाही अशा भयावह अवस्था झाली आहे. कोरोना महामारीने भल्याभल्यांना शांत केले, त्यात आम्ही काय… टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्या नशिबी जन्मापासूनच भिक्षा मागणे आले आहे. नशिबाला किंवा दुसऱ्या दोष न देता समाधानी जगले पाहिजे. कोरोनामुळे तृतीयपंथियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तृतियपंथीयसुद्धा माणूस आहे, त्यांना समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी भावना तृतियपंथी प्रेमा (रा. हडपसर, मूळ- ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यांनी व्यक्त केले.

प्रेमा म्हणाल्या की, आम्हा तृतियपंथीयांकडे समाज वाईट भावने बघतो, हेटाई करतो, पुढे जा म्हटले तरी आम्ही लगेच निघून जातो, वाद घालत बसत नाही, अभद्र बोलत नाही, आम्ही भीक मागत नाही, रुपया-दोन रुपये असे मनाला वाटेल तेवढे देतात, मिळेल त्यामध्ये समाधान मानतो. मात्र, आजही अनेक दुकानदार आणि नागरिक आदराने बोलावतात आणि भिक्षा देतात, त्यामुळे जगण्याला बळ मिळते, समाधान वाटते. पदपथ आणि रस्त्यावरील दुकानदार-भाजीपाला विक्रेते आम्हाला रुपया-दोन रुपये देत होते. मात्र, कोरोनामुळे दुकाने बंद आहेत, भाजीपाला विक्रीची दुकानेही सकाळी ७ ते ११ या वेळेत असतात, अशी अवस्था झाली आहे. कोरोनापूर्वी दुकानदार, भाजीविक्रेते आणि इतर व्यावसायिक रुपया-दोन रुपये देत देऊन आशीर्वाद घ्यायचे. मात्र, मागिल वर्षभरापासून लॉकडाऊन, अर्ध लॉकडाऊन आणि आता कडक निर्बंध जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दुकानांबरोबर अनेक व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे सिग्नलवर थांबून वाहनचालकांकडे दयेची याचना करावी लागत आहे. एक भाकरी खाऊन समाधानी होतो. मात्र, आता चतकोर भाकरीच्या तुडक्यावर जगावे लागत असल्याची व्यथा प्रेमाने मांडली.

नोकरी गेली, तर तो दुसरा व्यवसाय करतो. आम्हाला दुसरा व्यवसाय करता येत नाही, अशी अवस्था आहे. दुकानदारांच्या दारोदार जाऊन भीक्षा मागतात. भीक्षा मिळाल्यानंतर दुकानदारांना आशीर्वाद देऊन पुढे निघून जात होते. मात्र, कोरोना महामारीमुळे मागिल वर्षी सर्व व्यवहार ठप्प होते. त्यानंतर अनलॉक झाल्यानंतर सारे काही सुरळीत होईल, असे वाटले होते. मात्र, यावर्षी लॉकडाऊन नसले तरी कडक निर्बंधामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आमच्या भीक्षेवर परिणाम झाला आहे. मात्र गावाकडे जाणे पसंत केले. मात्र, गावाकडे आम्हाला समाज स्वीकारत नाही. गावाकडे नोकरीला ठेवत नाही. शहरात दुकाने-व्यवसाय बंद असल्याने आता आम्हाला सिग्नल आणि टोलनाक्यावर दयेची याचना करावी लागत आहे. त्यामध्ये जी काही शिदोरी मिळते, त्यावरच आमचे जीवन सुरू आहे.