Pune Traffic News | धायरी भागात जड वाहनांना बंदी

पुणे – Pune Traffic News | शहरातील धायरी परिसरात बेनकर वस्ती ते काळूबाई मंदिर चौक दरम्यान सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ वेळेत जड वाहनांना (Heavy Vehicles) बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाने (Traffic Department) हे आदेश काढले आहेत. (Pune Traffic News)

धायरीतील बेनकर वस्ती ते काळूबाई मंदिर चौक दरम्यानचा रस्ता गजबजलेला आहे. या भागात जड वाहनांमुळे कोंडीसह अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) भागात सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. दरम्यान, कोंढवा भागातील सहा रस्त्यांवर सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. (Pune Traffic News)

जड वाहनांसाठी बंदी घातलेले रस्ते

– येसाजी कामठे चौक ते कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, सोमजी चौकाकडून कोंढवा बुद्रककडे जाणारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील भोलेनाथ मंडळ चौकातून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयाकडून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, टिळेकरनगर चौकातून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता ते व्हीआयटी महाविद्यालय रस्ता परिसरातील शांतीबन सोसायटी परिसर.

Web Title :-  Pune Traffic News | Ban on heavy vehicles in Dhayari area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

India Squad NZ Series | न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आहे कर्णधारपद

Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात

Mumbai Indians | ज्युनियर ‘एबीडी’नं केला ‘हा’ मोठा पराक्रम, मुंबई इंडियन्स झाली खुश