Pune Traffic News | पुणे मेट्रो स्थानकाच्या कामासाठी कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर परिसरातील वाहतूकीत बदल

पुणे (Pune Traffic News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic News | मेट्रो स्थानकाच्या (Pune Metro Station) कामासाठी कोरेगाव पार्क (koregaon park) व कल्याणीनगर (kalyani nagar) परिसरातील वाहतूकीत बदल (Change in Traffic) करण्यात आला आहे. शनिवारपासून (उद्या) 9 ऑक्टोबरपर्यंत हा बदल प्रायोगिक तत्वावर असणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (deputy commissioner of police Rahul Shrirame) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

कोरेगाव पार्ककडून (koregaon park) बिशप स्कूलकडे (कल्याणीनगर) (bishop school kalyani nagar) जाणारी वाहतूक ‘एन. एम. चव्हाण चौक’ येथे बंद केली आहे. तर बिशप स्कूलकडून कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहतूक अ‍ॅडलॅब चौक (gold adlabs chowk) येथे बंद करण्यात आली आहे.

बिशप स्कूलकडुन कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने गोल्ड अ‍ॅडलॅब चौकातून उजवीकडे वळून
कल्याणीनगर लेन नंबर 7 या मार्गाने मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच, कोरेगाव पार्क एबीसी
चौकातून बिशप स्कूलकडे जाणारी वाहतूक ही एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळून
कल्याणीनगर लेन नंबर 8 येथून गोल्ड अ‍ॅडलॅब चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

हे देखील वाचा

Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार, राज्य सरकारकडून 3 सदस्यीय समिती स्थापन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Traffic News | Traffic changes in Koregaon Park and Kalyaninagar area for Pune Metro Station work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update