Pune Traffic Police | 1 जानेवारीला नववर्षानिमित्त दगडूशेठ गणपती येथे दर्शनासाठी येणार्‍या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | पुणे शहरात नूतन वर्षारंभाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील नागरिक मोठया प्रमाणात शहरातील वेगवेगळया रस्त्यांवर गर्दी करीत असतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagadusheth Halwai Ganapati Temple) व परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 5 पासून गर्दी संपेपर्यंत खालील नमुद रोडवरील वाहतूकीत बदल (Changes In Traffic On News Year In Pune) करण्यात आले आहेत. (Pune Traffic Police)

दि. 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत खालील नमुद रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) बंदी करण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छितस्थळी जावे. (Pune Traffic Police)

– बंद मार्ग – पुरम चौकातून बाजीराव रोडने शनिवारवार वाडा
पर्यायी मार्ग – सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौकातून इच्छितस्थळी जातील.

– बंद मार्ग – अप्पा बळवंत चौक ते पासोडया विठोबा चौक
पर्यायी मार्ग – आप्पा बळवंत चौक बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा व पुढे इच्छितस्थळी जावे.

– बंद मार्ग – स.गो. बर्वे चौक ते पुणे महापालिका भवन तसेच शनिवार वाडा
पर्यायी मार्ग – सदरची वाहने स.गो. बर्वे चौक – जंगली महाराज रोड मार्गे – झाशी राणी चौकातून इच्छितस्थळी जातील.

– बंद मार्ग – गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक
पर्यायी मार्ग – सदरची वाहने गाडगीळ पुतळा डावीकडे वळून कुंभारवाडा किंवा सुर्या हॉस्पीटल समोरून इच्छितस्थळी जातील.

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे आणि गर्दी टाळावी असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी केले आहे.

Web Title :-Pune Traffic Police | Change in traffic to avoid traffic jams caused by vehicles coming for darshan at Dagdusheth Ganapati on January 1 on the occasion of New Year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन

Brazil Football Legend Pele Dies At 82 | महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका