Pune Traffic Problem | ‘या’ वेळेत अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी, चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची पाहणी

वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते निर्देश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Problem | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक (Chandni Chowk) परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या (Pune Traffic Problem), वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील 15 दिवसात परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highway Authority) सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी (Pune Traffic Problem) संदर्भात स्थानिक प्रवाश्यांनी साताऱ्याला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेत संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची (Traffic Jams) पाहणी करून प्रवाशांची समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते.

 

त्यानुसार चांदणी चौक परिसराला भेटीनंतर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHA) कार्यालयात बैठक घेण्यात आली.
बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar),
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh),
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde),
अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Srirame), एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम (NHAI Project Director Sanjay Kadam), उपविभागीय अधिकारी संजय आसवले (Sub Divisional Officer Sanjay Asawle) आदी उपस्थित होते.

पश्चिमेकडून येणाऱ्या 9 लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होते.
हे लक्षात घेऊन बैठकीत लेनची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
रस्त्याच्या सुरु असलेल्या कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश विक्रमकुमार आणि डॉ. देशमुख यांनी दिले.

 

पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांलयाकडून प्रत्येकी 50 असे एकूण 100 मार्शल वाहतूक नियंत्रणासाठी नेमण्यात येणार आहे.
चांदणी चौकातील पूल नियंत्रीत ब्लास्टिंग पद्धतीने 15 दिवसात पाडण्यात येईल.
त्यानंतर त्वरीत नवीन लेन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
तत्पूर्वी पूलाजवळील पाणी पुरवठ्याच्या वाहिनीला पर्यायी वाहिनीचे काम करण्यात येईल.

 

वेदशाळेच्या जागेविषयी पुणे महानगरपालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) विशेष वकील नेमून स्थगिती आदेश रद्द करण्याविषयी विनंती करण्यात येईल, जेणेकरून सर्व्हिस लेनसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल.
उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्देशानुसार १ सप्टेंबरनंतर श्रृंगेरी मठ परिसरातील 548 चौ. मीटर पैकी 270 चौ. मीटर ताबा मिळणार असल्याने सर्व्हिस रोड सुरू होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या जडवाहतुकीला 30 सप्टेंबर पर्यंत सकाळी 8 ते 11 आणि
सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत दोन्ही पोलिस आयुक्तालयाच्या सीमेवर नियंत्रीत करण्यात येणार आहे,
जेणेकरून शहरातील वाहतूकीवरील अतिरिक्त ताण दूर होण्यास मदत होईल.

 

मुळशी ते सातारा मार्गावरील चांदणी चौकातील डांबरीकरणाचे काम पुढील 7 दिवसात पूर्ण करून हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.
यामुळे पुणे शहरातील वाहतूकीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.
वेद शाळेच्या समोरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधितांशी चर्चा करून 4 दिवसात दुरूस्तीचे काम करण्यात येईल.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 

Web Title : –  Pune Traffic Problem | Heavy vehicles are banned from entering the city during Ya hours officials inspect Chandni Chowk to solve the traffic problem

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा