Pune Traffic Updates News | नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरातील वाहतूकीत बदल, जाणून घ्या पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी रस्ते

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates News | रविवारी (15 ऑक्टोबर) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2023) सरुवात झाली आहे. पुण्यात शहरातील प्रमुख मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक शाखेने मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पुणे शहरातील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:श्रृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. (Pune Traffic Updates News)

बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रविवारपासून आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा) रस्ता वाहतुकीस बंद केला जाणार आहे. बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी दिली आहे. (Pune Traffic Updates News)

लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. सकाळ कार्यालयापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांसाठी बंद राहणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई केली आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर लावावीत. सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:श्रृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळवली जाणार आहे.

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे.
नेहरु रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
नेहरु रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई केली आहे.
गर्दी वाढल्यास नेहरु रस्त्यावरील वाहतुकीत बदल केला जाईल.

सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे.
स्वारगेटहून सारसबाग मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
मित्रमंडळ चौकाकडून येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On BJP Govt | ‘गुजरातमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर फुलांचा वर्षाव होतो तर मग मी…’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडिओ)