Pune Traffic Updates | वीर गोगादेव उत्सवानिमित्त पुणे कॅम्प भागातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | पुणे कॅम्पातील (Pune Camp) वीर गोगादेव उत्सवानिमित्त (Veer Gogadev Festival) न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक (Procession) निघणार आहे. ही मिरवणूक गुरुवारी (दि.7) सायंकाळी चारच्या सुमारास निघणार असून या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी (Pune Traffic Updates) होऊ नये यासाठी पुणे वाहतूक शाखेने (Pune Traffic Branch) या ठिकाणच्या वाहतुकीत बदल (Traffic Changes) केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी केले आहे.

वीर गोगादेव मुख्य मिरवणूक मार्ग

न्यु मोदीखाना रोडने पुलगेट पोलीस चौकी (Pulgate Police Chowki), मेढी माता मंदिर, महात्मा गांधी रोडने (MG Road) डावीकडे वळुन कुरेशी मशिद समोरून सेंट्रल स्ट्रिट रोडने सरळ भोपळे चौक ते सेंट्रल स्ट्रिट चौकी, उजवीकडे वळून महावीर चौक, महात्मा गांधी रोडने कोहीनुर हॉटेल चौक ते पुलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदिर येथे या मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे. (Pune Traffic Updates)

मिरवणूकीदरम्यान बंद करण्यात आलेले मार्ग आणि पर्य़ायी रस्ते

  1. वाय जंक्शन वरून महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतुक ही वाय जंक्शन येथे बंद करून ती खाणे मारुती चौक येथे वळवण्यात आली आहे. तसेच सोलापूर रोडला जाणारी वाहतुक ही खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळून जाईल व शहरात येणारी वाहतुक ही खाणे मारुती चौकातून सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने (East Street Road) इंदिरा गांधी चौकातून डावीकडे वळून महावीर चौक व तेथून पुढे एम.जी. रोड (MG Road) कडे जाईल किंवा इंदीरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलीस स्टेशन चौक (Lashkar Police Station Chowk) व तेथून डावीकडे वळून तीन तोफा चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.
  2. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक ही बंद करून वाहतूक ही चुडामन तालिमकडे वळवण्यात येणार आहे.
  3. होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदीरा गांधी चौकातून पुढे सोडण्यात येईल.


  4. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून वाहतूक एम.जी. रोडने नाझ चौकाकडे वळवण्यात येणार आहे.
  5. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक ताबुत स्ट्रिट रोडमार्गे पुढे सोडण्यात येईल.
  6. बाबाजान चौकाकडून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक शिवाजी मार्केटकडे वळवण्यात येणार आहे.
  7. बाबाजान चौकाकडून कुरेश मस्जिदकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून वाहतूक निशांत टॉकीजकडे वळवण्यात आली आहे.
  8. शिवाजीमार्केट कडून सेंटर स्ट्रिट चौकीकडे जाणारी वाहतूक तसेच कोळसा गल्लीकडून एमजी रोडकडे जाणारी
    वाहतूक परिस्थितीनुसार बंद करण्यात येणार आहे.

वाहन चालकांनी मिरवणूक सुरु झाल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत पर्य़ायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग