Pune Traffic Updates | वारजे रोझरी स्कूल परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई बेंगलोर महामार्गावरील सातारा लेनवर वारजे रोझरी स्कूल अंडरपास जवळ एक्सपान्शन जॉईंट दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम करत असताना वाहतूकीस अडथळा अथवा काही प्रकार होऊ नये यासाठी सोमवार (दि.15 जानेवारी) ते 2 फेब्रुवारी 2024 दरम्यान या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कळवले आहे.

वाहतुकीतील बदल खालील प्रमाणे

मुंबई ते सातारा बायपास रोडवरील वारजे रोझरी स्कूल अंडरपास जवळील साताऱ्याकडे जाणाऱ्या तीन लेन पैकी एक लेन बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहतूक उर्वरित दोन लेन व सर्व्हिस रोडवरुन सुरु राहणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMPML News | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार !

ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द; पुरोहित वर्गाने अटल पेन्शनचा लाभ घ्यावा!