Pune Treasury Office | निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Treasury Office | निवृत्तीधारक व्यक्तीसाठी (Retiree) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे कोषागार कार्यालयातून (Pune Treasury Office) निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य सरकारी सेवेमधून सेवानिवृत्त झालेले भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), तसेच माजी आमदार (Former MLA) यांच्यासह सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी (Income tax relief) गुंतवणूकीची कागदपत्रे (Documents) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

अशा निवृत्तीधारकांना पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून (Pune Treasury Office) आयकर सवलतीसाठी (Income tax relief) गुंतवणूकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास आयकराची (Income tax) गणना होते. म्हणून करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांहून जास्त असल्यास त्यांनी आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) चे कलम 80 C, 80 CCC, 80 D, 80 G नुसार गुंतवणूक, बचत केली असल्यास त्याची कागदपत्रे, सत्यप्रत तसेच पॅनकार्डची (PAN Card) सत्यप्रत सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

 

वरील नमुदे केलेले सर्व कागदपत्रे कोषागार कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष अथवा [email protected] या ई-मेल पत्त्यावर मेलच्या माध्यमातून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे कागदपत्रे सादर करण्याची अखेरची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
असं देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास
अप्पर कोषागार अधिकारी (Upper Treasury Officer) पुणे हे आयकर कायदा कलम 191 (Income Tax Act 1961) नुसार
आहरण संवितरण अधिकारी म्हणून सन 2021-22 च्या आयकराची कपात पात्र निवृत्ती वेतनधारकांच्या
निवृत्ती वेतनातून (pensioners) हप्त्यांत करतील, अशी माहिती वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Treasury Office | appeal retirees submit documents income tax relief itr

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा