Pune : खडकी व नगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात 2 पादचाऱ्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत पादचारी जेष्ठ नागरिक आहेत. खडकी व नगर रस्त्यावर भागात घडली. खडकीत झालेल्या अपघातात महादेव हंबीर कांबळे (वय ५९, रा. बोपोडी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगा प्रद्यन्म यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडकीत एलफिस्टन रोडवरून महादेव यांना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महादेव यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रेमा पाटील करत आहेत.

दरम्यान, नगर रस्त्यावर झालेल्या अपघातात उत्तम भोजाजी रणखांबे (वय ७०, रा. कटकेवाडी, वाघोली) यांचा मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला आहे. गुरूवारी सायंकाळी हा अपघात झाला आहे. त्यांचे नातू प्रमोद कांबळे (वय २६) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कर्णवर करत आहेत.