pune university news today | पुणे विद्यापीठाच्या ‘SPPU OXY PARK’ योजनेला 24 तासांत स्थागिती; विद्यापीठात फिरण्यासाठी द्यावे लागणार होते 1 हजार रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) परिसरात सकाळी अथवा संध्याकाळची वेळ घालवण्यासाठी पुणेकर फिरण्यासाठी येत असतात. मात्र, विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पुणेकरांना एसपीपीयू ऑक्सी पार्क (SPPU OXY PARK)’ योजना आणली. परंतु विद्यापीठानं प्रति महिना 1 हजार रुपये आकारावे लागणार असल्याचं परिपत्रक जारी केलं होतं. विद्यापीठाच्या या निर्णयाला अनेक पुणेकरांनी तसेच विद्यार्थ्यांनी विरोध केला. यामुळे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) दरमहा एक हजार रुपये आकारण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

विद्यापीठाच्या निर्णयावर अनेक पुणेकरांनी टीका केली होती.
विद्यापीठ हे शासकीय ठिकाण असताना विद्यापीठ रजिष्टार आणि कुलगुरू यांनी संगनमताने सामान्य लोकांना लुटण्याचा हा नवा फंडा काढला आहे.
असं पुणेकर म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधत चर्चा केली.
विद्यापीठाने एसपीपीयू ऑक्सी पार्क ‘(SPPU OXY PARK)’ या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या सामान्य नागरिकांनाकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत असं मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याबाबत स्थगितीचं परिपत्रक लवकरच विद्यापीठ प्रशासनाकडून जारी करण्यात येईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणेकरांसाठी ‘SPPU OXY PARK’ या नावाने योजना आणली होती.
त्याची अमबजावणी कोरोनामुळे झाली नव्हती.
काल शुक्रवारी विद्यापीठानं एक परिपत्रक जारी केलं होतं.
आणि या योजनेंतर्गत विद्यापीठात व्यायामाला आणि विहाराला येणाऱ्या नागरिकांना सभासद नोंदणी करून त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतले जाणार असल्याचं म्हटलं होत.
मात्र, या निर्णयावर पुणेकर नाराज होते.
अनेक टीका पुणेकरांनी केल्यावर या निर्णयाला अखेर स्थगिती दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune university sppu oxy park scheme abeyance within 24 hours uday samant

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले