परीक्षा ऑफलाईन होणार ? पुणे विद्यापीठाचे परीक्षेबाबत नियोजन, विद्यार्थ्यांची चिंता वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होण्याची शक्यता आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं अंतिम वर्ष आणि बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईनच घेतल्या. पण आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने
परीक्षा ह्या प्रत्यक्ष घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबात पुणे विद्यापीठ पहिल्या सत्राच्या परीक्षांचं नियोजन करत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे टाळेबंदीचा फटका महाविद्यालयं आणि शाळांवर पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं पहिलं सत्र पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनं गेलं असल्याने आताही परिक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे. तर पुणे विद्यापीटातील विद्यार्थ्यांनी मोबाईल, ल्रॅपटॉप, टॅब आणि कॉमप्युटरवर परीक्षा दिल्या. त्यामुळे, परीक्षेवेळी अनेक गैरप्रकार झाले. अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र बसून पेपर सोडवले, तर अनेकांनी गुगलच्या मदतीनं परीक्षा दिली. याचा परिणाम म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली.

दरम्यान, बॅकलॉग परीक्षेच्या वेळी तांत्रिक अडचणी कमी होण्यासाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी प्रॉक्टोरड पद्धत वापरली गेली. मात्र, तरीही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी पाहून आणि चिटींग करून पेपर सोडवल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. तसेच, यासंदर्भात आता पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे, या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं असणार आहे.