Pune Unlock | पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर ! सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्य सरकारनं अनलॉकची (Unlock) नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने (pune municipal corporation) देखील सोमवारपासुन शहरात नवीन नियमावली लागू करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत (Pune Unlock). पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (pune municipal corporation commissioner vikram kumar) यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (pune mayor murlidhar mohol) यांनी ट्विट करून सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचं सांगितले आहे. Pune Municipal Corporation announces new rules! From Monday until 4 pm, all shops open, find out what’s on and what’s off

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सोमवारपासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दुकानांच्या वेळा आणि इतर बाबी खालील प्रमाणे आहेत

1. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार पुर्णतः बंद राहतील.

3. मॉल, सिनेमागृह, नाटयगृह, संपूर्णतः बंद राहतील

4. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रारी दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

5. लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचार्‍यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

6. पुणे मनपा क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवडयातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहील.

7. सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये कामाचे दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

8. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

9. सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरू राहतील.

10. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी राहील.

* मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहील.

इतर आदेश ट्विट प्रमाणे…..

Web Title : Pune Municipal Corporation announces new rules! From Monday until 4 pm, all shops open, find out what’s on and what’s off

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती