पुणे : व्हॅन आणि रिक्षाचा भीषण अपघात; ओढ्यात पडून दोघांचा मृत्यू तर दोघे बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नसरापूर-वेल्हा रस्त्यावर पिक-अप व्हॅनने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षात बसलेल्या दोघांचा ओढ्यात पडून मृत्यू झाला. तर दोनजण बेपत्ता झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका मुख्याध्यापकाचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी (दि.२१) नसरापूर वेल्हा रस्त्यावर आंबवणे येथे रात्री आठच्या सुमारास झाला.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9015733-8d98-11e8-9d5e-9953f3b33641′]

भोर तालुक्यातील कुरुंगावडी शाळेचे मुख्याध्यापक रमेश बाळू जाधव (वय ४८) व बाळू तिकोळे (दोघे रा. जांभळी) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबवण्याकडून नसरापूरकडे एक रिक्षा चालली होती. आंबवणे येथील पुलावर भरधाव वेगाने एक पिक-अप व्हॅन वेल्ह्याच्या दिशेने निघाली होती. या व्हॅनची रिक्षाला जोरदार धडक बसली. या वेळी रिक्षात चार जण बसले होते. धडक बसल्यामुळे रिक्षातील जाधव आणि तिकोळे ओढ्यात पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  रिक्षातील अन्य दोघे जण बेपत्ता आहेत. पुढील तपास वेल्हा तालुका सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलवान करीत आहेत.