Pune Wagholi Crime | वीजबिल थकल्याचे सांगून एकाची आर्थिक फसवणूक, वाघोली परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wagholi Crime | महावितरण वीजबिल थकित (Light Bill) असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) वाघली परिसरात राहमाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक (Cheating Case) केल्याची घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी महावितरणचे (Pune Mahavitaran News) कर्मचारी बोलत असल्याचे भासवून 94 हजार रुपयांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

याबाबत वाघोली परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय युवकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) शुक्रवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरुन 7032017686 मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420 सह माहीती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Wagholi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांना 6 फेब्रुवारी रोजी एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन आला.
महावितरण कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून तुमचे मागील महिन्याचे वीज बिल थकीत असल्याचे सांगितले.
थकित बिल लवकरात लवकर भरा अन्यथा आजच तुमची विज बंद केली जाईल असे सांगितले.
त्यानंतर वीजबिल भरण्याचा बहाना केला.

बिल भरण्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलचा रिमोट अ‍ॅक्सेस मिळवला. खासगी माहितीचा वापर करुन फिर्य़ादी यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून 94 हजार 235 रुपये ट्रान्सफर करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions |लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ