Pune Wagholi Traffic Updates | खांदवेनगर ते आळंदी बाह्यवळण मार्ग विकसनाला पालकमंत्र्यांच्या बैठकीत तत्वत: मान्यता

वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाचे पुढचे पाउल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Wagholi Traffic Updates | वाघोली येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथील खांदवेनगर आव्हाळवाडी मार्गे आळंदीकडे जाणार्‍या सुमारे साडेचार कि.मी. बाह्यवळण मार्गाचे काम महापालिका आणि पीएमआरडीएच्या संयुक्त विद्यमाने करण्याला आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली, अशी माहिती पीएमआरडीएचे (PMRDA) आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal) यांनी दिली. (Pune Wagholi Traffic Updates)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत आज महापालिकेत झालेल्या बैठकीला पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महावितरणचे अधिकारी आणि पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये वाघोली परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा, वीज मंडळाचे सब स्टेशन, ड्रेनेज लाईन, पोलिस स्टेशन, घन कचरा व्यवस्थापन अशा बहुतांश विषयांवर चर्चा झाली. या बैठकीमध्ये वाघोलीतील वाहतूक कोंडीवर प्रामुख्याने निर्णय घेण्यात आला. (Pune Wagholi Traffic Updates)

वाघोली परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी खांदवेनगर येथून आव्हाळवाडी मार्गे आळंदीकडे जाणार्‍या सुमारे साडेचार कि.मी. बाह्यवळण मार्गाचे काम तातडीने हाती घेण्यास पालकमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली. यापुर्वी पीएमआडीएच्या हद्दीत असलेले वाघोली नंतर महापालिकेकडे वर्ग झाली. या रस्त्याच्या कामासाठी पीएमआरडीएने साडेबारा कोटी रुपयांच्या कामाला मान्यताही दिली होती. परंतू नंतर हे काम रद्द करण्यात आले. यापुर्वी या भागात पीएमआरडीएने बांधकाम परवानग्या दिल्या असून त्यापोटी शुल्कही जमा केले आहे. रस्त्याच्या कामाचे पुन्हा सध्याच्या दराने एस्टीमेट करण्यात येईल. कामासाठी ७५ टक्के निधी पीएमआरडीएकडून देण्याबाबत बैठकीत निर्णय झाल्याचे महिवाल यांनी सांगितले.

यासोबतच वाघोली गावासाठी पीएमआरडीएच्या मार्फत ५ एमएलडी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून कामही सुरू करण्यात आले आहे. हे कामही ऑक्टोबरपर्यंत पुर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासित करण्यात आले आहे. महावितरण ने या परिसरासाठी स्वतंत्र सब स्टेशन उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन महापालिकेच्यावतीने देण्यात आल्याचेही महिवाल यांनी नमूद केले.

चोवीस तास पाणी पुरवठा आणि मैलापाणी प्रक्रिया केंद्रांच्या कामांचा आढावा

पुणे महापालिकेच्यावतीने चोवीस तास पाणी पुरवठा योजना तसेच मैलापाणी प्रक्रिया केंद्रांच्या (एसटीपी)
कामांचे सद्यस्थितीचे प्रेझेंटेशन या बैठकीमध्ये देण्यात आले आहे. एसटीपीसाठी भूसंपादन करण्यात राज्य व केंद्र
शासनाच्या जागांचे संपादन करण्यात येणार्‍या तसेच भौगोलिक परिस्थितीमुळे येणार्‍या अडचणी अधिकार्‍यांनी
या बैठकीमध्ये मांडल्या. राज्य व केंद्र शासनाच्या जागा संपादीत करण्यासाठी संबधित विभागांकडे प्रयत्न करू,
असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Research on Social Media | मेंदूवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह प्रभाव पडतो की नाही? लेटेस्ट रिसर्चचा दावा आश्चर्यचकित करेल तुम्हाला

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, केसगळतीला लागेल ब्रेक