Pune Wakad Crime | पिंपरी : पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण, चाकूने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wakad Crime | पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला मेहुणा आणि सासऱ्याने बेदम मारहाण करुन चाकूने वार केले. या घटनेत जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.12) रात्री दहा वाजता विशालनगर, वाकड येथे घडली.(Pune Wakad Crime)

याबाबत आदित्य रजनीकांत मंगरुळे (वय 26, रा. तुळशीबाग, सोलापूर रोड, हडपसर, पुणे) असे जखमी जावयाचे नाव असून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मेहुणा स्वप्नील तेजराव रणीत (वय 34), सासरे तेजराव रणीत (दोघे रा. हॉटेल सयाजी मागे, वाकड) यांच्या विरोधात आयपीसी 324, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य यांची पत्नी माहेरी वाकड येथे आली आहे.
त्यामुळे फिर्यादी पत्नीला भेटण्यासाठी वाकड येथे आले. त्यावेळी मेहुणा स्वप्नील याने फिर्य़ादी यांच्या डोळ्यात
मिरचीपुड टाकून चाकुने दंडावर व मानेवर चाकूने वार करुन जखमी केले.
तर सासरे तेजराव यांनी आदित्य यांना लाकडी बांबुने कपाळावर व डोक्यावर मारहाण करुन जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार