Pune Wanwadi Crime | जंगलात रिक्षा थांबवून अल्पवयीन मुलाला लुटले, वानवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | रिक्षातून घर जात असताना रिक्षाचालकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन प्रवासी मुलाला लुटले. हा प्रकार वानवडी इंडस्ट्रीयल एरिया मधील जंगलात शनिवारी (दि.17) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) रिक्षाचलाकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. (Robbery In Pune)

याप्रकरणी केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक अक्षय व त्याचा साथीदार प्रेम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Wanwadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण मुंढवा येथे घरी जाण्यासाठी हडपसर येथील गाडीतळ येथून आरोपी अक्षयच्या रिक्षामध्ये (एमएच 12 आर 5792) बसला. यावेळी रिक्षात अक्षयचा मित्र प्रेम याआधीच बसला होता. रिक्षा वानवडी इंडस्ट्रियल भागातील जंगलात आली असताना आरोपी अक्षय याने रिक्षा थांबवली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने हातातील ब्रेसलेट, मोबाईल आणि कपड्यांची सॅक जबरदस्तीने काढून घेतली. यानंतर त्याला तिथेच जंगलात सोडून आरोपींनी पळ काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका