Pune Water Supply | पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा, ‘या’ भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पाणीपुरवठाच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4, खराडी (kharadi) मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडी मध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे (Pune Water Supply) नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार पासून (10 जून) खराडी मध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ

शुक्रवार, रविवार, मंगळवारी दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, पीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. चौधरी वस्ती, सातव वस्ती, पंढरी नगर, गुलमोहर, रक्षक नगर, शंकरनगर भागाला सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या कालावधीत शुक्रवारी, रविवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा होईल. (Pune Water Supply)

शनिवार, सोमवार, बुधवारी या दिवशी दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.00 यावेळेत बोराटे वस्ती गल्ली नं. 1 ते 13,
शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्र नगर, यशवंत नगर, तुकाराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क,
साईबाबा मंदिर परिसर. तर सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेत गणपती सोसायटी, तुकाराम नगर, बोराटेवस्ती,
झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर परिसराला पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी नव्या वेळापत्रकानुसार सहकार्य करावे,
असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून (Water Supply Department) करण्यात आले आहे.

Web Title :   Pune Water Supply | day by day water supply in pune change in water supply in chandannagar kharadi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन