Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर अशांत (Kolhapur Violence) आहे. बुधवारी कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला. यावेळी तिथे दंगलसदृश्य (Kolhapur Violence) परिस्थिती निर्माण झाली होती. यावरुन राज्याच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी कोल्हापूर पोलिसांना (Kolhapur Police) सल्ला दिला आहे.

सातत्याने कोल्हापूर आणि आजूबाजूंची गावं अशांत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर येथील पोलीस यंत्रणा कमी पडली का असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. यावर छत्रपती शाहू महाराज म्हणाले, आता जे झालं ते झालं. ते बदलता येणार नाही. परंतु, यापुढे पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे. सीआयडीसारख्या (CID) ज्या यंत्रणा आहेत त्यांना अधिक सक्रिय केलं पाहिजे.

कोल्हापूरमध्ये (Kolhapur Violence) काल घडलेला प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. माझं बोलणं झालं होतं. कालच सांगितलं होतं की, काही असलं तर मला बोलवा. दोन्ही समजात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून माझा काही उपयोग होत असेल तर करुन घ्या, असंही छत्रपती शाहू महाराज म्हणाले.

कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता

काही मुलांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर औरंगजेबाचे (Aurangzeb) फोटो ठेवल्याप्रकरणी कोल्हापूरात राडा झाला.
मंगळवारी कोल्हापुरात दंगल उसळल्यानंतर बुधवारी कोल्हापूर बंद पाळण्यात आला.
आताही कोल्हापूरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, याप्रकरणी 36 जणांना अटक केली असून यामध्ये
तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (SP Mahendra Pandit) यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती काल दुपारपासून पूर्ववत झाली आहे. 4 SRPF च्या तुकड्या, 300 पोलीस कॉनस्टेबल, 60 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशीही माहिती महेंद्र पंडित यांनी दिली.

Web Title :  Kolhapur Violence | chhatrapati shahu maharaj reaction on kolhapur aurangazeb incident saying police should more carefull onwords

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

Maharashtra Police News | काय सांगता ! होय, पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे (PhonePe) वरून वसुली (Hafta Vasuli), वरिष्ठांनी केली कडक कारवाई