NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कोल्हापूरमध्ये काल उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी (Kolhapur Violence) दिली. महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य आहे. कायदा हातात घेण्याची इथल्या लोकांची वृत्ती नाही. सर्वसामान्यांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावं, अस आवाहन शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलं. ते बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केलं तर ही अवस्था तातडीने बंद झाल्याचे पाहण्यास मिळेल. कोल्हापूर असो किंवा अन्य शहरं असोत सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्या ठिकाणी शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे. छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) आणि महाराणी ताराराणी (Maharani Tararani) यांचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. दोन चार लोक चुकीचं वागत असतील पण प्रशासनाचं ऐकलं तर शांतता प्रस्थापित होईल. बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने (State Government) यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असंही पवार म्हणाले.

कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता

काही मुलांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर औरंगजेबाचे फोटो ठेवल्याप्रकरणी कोल्हापूरात राडा झाला.
मंगळवारी कोल्हापुरात दंगल उसळल्यानंतर बुधवारी कोल्हापूर बंद पाळण्यात आला.
आताही कोल्हापूरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, याप्रकरणी 36 जणांना अटक केली असून यामध्ये
तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (SP Mahendra Pandit) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती काल दुपारपासून पूर्ववत झाली आहे. 4 SRPF च्या तुकड्या,
300 पोलीस कॉनस्टेबल, 60 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशीही माहिती महेंद्र पडित यांनी दिली.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | ‘What happened in Kolhapur does not suit Maharashtra’s character’, Sharad Pawar’s appeal after the protest of Hindutva organizations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी