Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | लष्कर जलकेंद्र (Lashkar Water Station), वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/ पंपींग विषयक वितरण विभागाकडील स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी (दि.13) उपरोक्त पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

तसेच शुक्रवारी (दि.14) सकळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMCपाणीपुरवठा विभागने दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

लष्कर जलकेंद्र भाग

संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रोड, भीम नगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी.

 

वडगाव जलकेंद्र परिसर

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,
भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी,
सहकारनगर भाग-2, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to some parts of Pune city will be closed on Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा