Pune : शॉक लागून कामगार गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घराचे काम करत असताना हाय टेन्शन विद्युत वाहिनाचा शॉक लागून एक कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. त्यांचे दोन्ही पाय नडगीपासून काढावे लागले आहेत. वानवडी येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक कोंडीबा साठे (वय 53, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष विलास अडसूळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घराच्या दुरुस्तीचे कामे करतात. तर विलास हा ठेकेदार आहे. विलास यांच्या मार्फतीने फिर्यादी हे वानवडी येथील वर्मा यांच्या चौकटीचे व स्लॅबचे काम करत होते. यावेळी वर्मा यांच्या घराच्यावरून थ्री फेज लाईन गेली होती. यावेळी फिर्यादीनी त्यांना या वायरवर पाईपचे कव्हर लावने आवश्यक असल्याचे सांगितले होते. पण, यावेळी ठेकेदार विलास याने काही गरज नाही खाली वाकून काम कर, असे सांगितले.

यावेळी फिर्यादी हे काम करत असताना डोक्यावरून गेलेल्या वायरला स्पर्श होऊन त्यांना जबरदस्त शॉक बसला. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. यात छाती व पाय भाजले होते. उपचार करत असताना त्यांचे दोन्ही पाय नडगीपासू काढून टाकावे लागले. यात ते अपंग झाले असून, आरोपी ठेकेदाराने सांगून पण सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने हा प्रकार घडला आहे, असे दिसून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 4 सप्टेंबर रोजी घडला आहे. याप्रकरणी अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.