Pune Yerwada Building Collapse | शास्त्रीनगर दुर्घटना ! बांधकामाला ‘स्टॉप वर्क’; दुर्घटनेच्या चौकशीसाठी 10 सदस्यीय समिती स्थापन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerwada Building Collapse | येरवडा परिसरातील (Yerwada) शास्त्रीनगर (Shastri Nagar) येथील ब्लूग्रास बिझनेस पार्क (Bluegrass Business Park) कंपनीच्या दुर्घटनाग्रस्त बांधकामाला महापालिकेने (Pune Corporation) स्टॉप वर्क नोटीस (Stop Work Notice) बजावली असून या घटनेच्या चौकशीसाठी 10 सदस्यीय समिती (Committee for Inquiry) स्थापन करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुधीर कदम (Superintendent Engineer Sudhir Kadam) यांनी दिली. (Pune Yerwada Building Collapse)

 

शास्त्रीनगर येथे ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीच्या टॉवरचे बांधकाम सुरू आहे. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी जाळ्या फिटिंगचे काम सुरू असतानाच ते कोसळले. त्यामुळे वरील बाजूस व खाली काम करणारे मजूर त्याखाली दबले. यामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला असून काही गंभीर जखमी झाले आहेत. (Pune Yerwada Building Collapse)

 

घटनेची माहिती कळताच महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (PMC Addl Commissioner Ravindra Binwade), नगर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare) यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.(Pune Yerwada Building Collapse)

 

पालिका प्रशासनाने (PMC Administration) तातडीने या बांधकामास स्टॉप वर्क नोटीस बजावली. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी 10 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या घटनेस दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

10 सदस्यीय चौकशी समिती

1. डॉ. राजेश देशमुख Collector Dr. Rajesh Deshmukh (जिल्हाधिकारी, पुणे – अध्यक्ष)

2. रोहिदास पवार DCP Rohidas Pawar (पोलिस उपायुक्त, झोन 4 – सदस्य)

3. अभिजित केतकर Abhijit Ketkar – Assistant Director, Town Planning (सहाय्यक संचालक, नगररचना – सदस्य)

4. अतुल चव्हाण Atul Chavan – Superintending Engineer, Public Works Development Department (अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विकास विभाग – सदस्य)

5. सुनील गिलबिले Sunil Gilbile – Chief Fire Officer, Pune Municipal Corporation (मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे मनपा – सदस्य)

Advt.

6. अभय गिते Abhay Gite – Deputy Commissioner, Labor Welfare Department ( उप आयुक्त, कामगार कल्याण विभाग – सदस्य)

7. धैयशील खैरेपाटील Dhairyasheel Khairepatil – Structural Engineer (स्ट्रक्चरल इंजिनिअर – सदस्य)

8. संदीप बावडेकर Sandeep Bawdekar – Architect (आर्कीटेक्ट – सदस्य)

9. संजय देशपांडे Sanjay Deshpande – Credai (क्रेडाई – सदस्य)

10. सुधीर कदम Sudhir Kadam (Superintending Engineer, Construction Development Department, Pune Municipal Corporation- (अधिक्षक अभियंता, बांधकाम विकास विभाग, पुणे मनपा – सदस्य सचिव)

 

Web Title :- Pune Yerwada Building Collapse | Yerwada Shastri Nagar Incident PMC Administration give Stop work notice to Bluegrass Business Park for construction Establishment of a ten member committeefor Inquiry

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा