Puneet Balan Group-Friendship Cup | गुरूजी तालिम टायटन्स्, मिडीया रायटर्स, तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, युवा योध्दाज्, नादब्रह्म ड्रमर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघांची विजयी कामगिरी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Puneet Balan Group-Friendship Cup | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, मिडीया रायटर्स, तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, युवा योध्दाज्,नादब्रह्म ड्रमर्स आणि जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Puneet Balan Group-Friendship Cup)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत निवृत्ती पोळेकर
याच्या कमिगिरीमुळे गुरूजी तालिम टायटन्स् संघाने कसबा सुपर किंग्ज्चा ९ गडी राखून पराभव केला. दिपक कापरे याच्या ६३
धावांच्या जोरावर मिडीया रायटर्स संघाने गरूड स्ट्रायकर्स संघाचा सहज पराभव केला.
मिथून चव्हाण याच्या फलंदाजीच्या जोरावर तुळशीबाग टस्कर्स संघाने जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला.
(Puneet Balan Group-Friendship Cup)

शितळादेवी सुपरनोव्हाज् संघाने कसबा सुपर किंग्ज् संघाचा; युवा योध्दाज् संघाने श्रीराम पथक संघाचा;
नादब्रह्म ड्रमर्स संघाने मंडई मास्टर्स संघाचा; जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाने मंडई मास्टर्स संघाचा पराभव करून आगेकूच केली.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

१) कसबा सुपर किंग्ज्ः ८ षटकात ७ गडी बाद ४८ धावा (राहूल रूपडे १०, निवृत्ती पोळेकर १-११,
सुशिल फाले १-१४) पराभूत वि. गुरूजी तालिम टायटन्स्ः ३.१ षटकात १ गडी बाद ४९ धावा
(निवृत्ती पोळेकर नाबाद २१, रणवीर परदेशी नाबाद १५, सचिन पै १-२५); सामनावीरः निवृत्ती पोळेकर;

२) मिडीया रायटर्सः ८ षटकात २ गडी बाद ११३ धावा (दिपक कापरे नाबाद ६३ (३०, ११ चौकार),
शैलेश काळे २५) वि.वि. गरूड स्ट्रायकर्सः ८ षटकात ४ गडी बाद ७५ धावा (आलोक जेंढे ४३, सोमनाथ कांबळे १२,
दिपक कापरे १-१३, प्रदीप खैंगरे १-१२); सामनावीरः दिपक कापरे;

३) जोगेश्‍वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ४ गडी बाद ६८ धावा (अजिंक्य गायकवाड २६, अनिकेत कारेकर २५)
पराभूत वि. तुळशीबाग टस्कर्सः ७.२ षटकात ४ गडी बाद ६९ धावा (मिथून चव्हाण नाबाद ४४, नितीन पंडीत १०,
प्रविण सी. २-११); सामनावीरः मिथुन चव्हाण;

४) कसबा सुपर किंग्ज्ः ८ षटकात ४ गडी बाद ५९ धावा (गिरीश हसबनीस नाबाद २२, राहूल रूपाडे १४)
पराभूत वि. शितळादेवी सुपरनोव्हाज्ः ४.५ षटकात २ गडी बाद ६२ धावा
(मयुर पाठारे ४१, गणेश बानगवे १४, भुषण रूपाडे १-१०); सामनावीरः मयुर पाठारे;

 

 

५) युवा योध्दाज्ः ८ षटकात ८ गडी ७० धावा (प्रकाश चव्हाण १६, देव नातू ११,
निखील कटवाटे ३-१३, अजिंक्य गायकवाड २-२१) वि.वि. श्रीराम पथक: ८ षटकात २ गडी बाद ५३ धावा
(रोहीत विधवान्स् नाबाद ३२, सागर जगताप १-१३); सामनावीरः निखील कटवाटे;

६) मंडई मास्टर्सः ८ षटकात ७ गडी बाद ६१ धावा (शुभम भोसले १६, सुरज थोरात १२,
शंतनु गांधी २-१३, शुभम जैन १-१९) पराभूत वि. नादब्रह्म ड्रमर्सः ५.५ षटकात २ गडी बाद ६३ धावा
(अभिषेक राठोड २२, निलेश वाघमारे २४, शुभम जैन १२, सुरज थोरात १-९); सामनावीरः शुभम जैन;

७) जोगेश्‍वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ४ गडी बाद ९२ धावा (अजिंक्य गायकवाड ४१,
कुणाल भिलारे २४, आशिष शेंडगे १३) वि.वि. मंडई मास्टर्सः ८ षटकात ८ गडी बाद ४७ धावा
(सुरज थोरात १५, संकेत तापकीर ११, आशिष शेंडगे ३-७); सामनावीरः आशिष शेंडगे;

Web Title :- Puneet Balan Group-Friendship Cup | Winning performance of Guruji Talim Titans, Media Writers, Tulshibagh Tuskers, Shitaladevi Supernovas, Young Warriors, Nadbrahm Drummers, Jogeshwari Jaguars!


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात मांजरीचा मर्डर ! पोस्टमार्टमनंतर शेजारील महिलेवर FIR

Multibagger Penny Stock | 36 रुपयांच्या शेयरची कमाल, अवघ्या इतक्या वर्षात झाले 1 लाखाचे 18 लाख रुपये

Vasant More | ‘राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील’ – वसंत मोरे