Puneet Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे 23 नोव्हेंबर पासून आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Puneet Balan Group | स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये लिजेंडस् स्पोर्ट्स क्लब मैदान, मुंढवा येथे होणार आहे. (Puneet Balan Group)

 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, करोना महामारीच्या संकटानंतर सर्वांचेच जीवन पुर्वपदावर येऊ लागले असून १४ वर्षाखालील आणि युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव, संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला पुनित बालन ग्रुप (Puneet Balan Group) यांचे प्रायोजक्त्व लाभले आहे.

 

पुण्यातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या १४ वर्षाखालील स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ क्रिकेट क्लब सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे साखळी आणि उपांत्य फेरीचे १४ सामने ३०-३० षटकांचे होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ४०-४० षटकांचा होणार आहे. ३० आणि ४० षटकांचे सामन्यांमध्ये वेगळ्या पध्दतीने आपल्याला खेळ करावा लागतो. त्यामुळे अशा अधिक षटकांच्या सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

 

 

हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पेस अ‍ॅथलॅटिक क्रिकेट, निंबाळकर रॉयल्स्,
ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, रोहित राज क्रिकेट ॲकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी या ८ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
लाल बॉलमध्ये होणार्‍या या स्पर्धेत १५ सामने होणार आहेत. स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने २ डिसेंबर २०२१ रोजी तर,
अंतिम सामना ३ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.

 

स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला सन्मानचिन्ह आणि करंडक मिळणार आहे.
स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज तसेच करंडक तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि उदयोन्मुख खेळाडू याला करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन पुनित बालन ग्रुपचे (Puneet Balan Group) कार्यकारी संचालक पुनित बालन (Puneet Balan) यांच्या हस्ते होणार आहे.

 

Web Title :- Puneet Balan Group | The first ‘Punit Balan Trophy’ Under-14 cricket tournament will be held from November 23

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा