Pune Ring Road | अखेर पुण्याच्या रिंगरोडची रुंदी कमी करण्यास राज्य सरकारची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या रिंगरोडची (Pune Ring Road) रुंदी (Width) कमी करण्यास अखेर राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्यता दिली आहे. त्यामुळे 88 किलोमीटर लांबीचा रिंगरोड (Pune Ring Road) आता 65 मीटर रुंदीचा होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेल्या रिंगरोडच्या कामाला गती येणार आहे.

 

PMRDA ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड (Pune Ring Road) विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एकूण 128 किमी लांबीचा हा रिंगरोड होता. पहिल्या टप्प्यात 90 मीटर रुंदीचा होता. मात्र, मध्यंतरी MSRDC च्या रिंगरोड प्रमाणेच तो 110 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची रुंदी वाढवण्याचा प्रस्ताव PMRDA ने राज्य सरकारकडे पाठविला. त्यास राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने मान्यता दिली. त्याबाबतचे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले (Kishor Gokhale) यांनी काढले आहेत. त्यावर तीस दिवसांत नागरिकांनी PMRDA कडे हरकती-सूचना दाखल करता येणार आहेत.

 

PMRDA चा रिंगरोड हा 128 किमी लांबीचा होता. मात्र PMRDA आणि MSRDC या दोन्ही रिंगरोडमध्ये 15 किमीचे अंतर आहे.
दोन्ही रिंगरोड काही गावांमध्ये एकमेकांना ओव्हरलॅप (Overlap) होतात.
त्यामुळे ज्या गावांमध्ये हे दोन्ही रिंगरोड एकमेकांना ओव्हरलॅप होत आहे,
अशा गावातील 40 किमी लांबीचा MSRDC चा रिंगरोड वगळण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.
मध्यंतरी तो MSRDC कडे वर्ग करण्यात आल्याने PMRDA चा रिंगरोड आता 88 किमीचा होणार आहे.

 

Web Title :- Pune Ring Road | maharashtra government approves reduction of pune ring road marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा