Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा; साई पॉवर हिटर्स संघाला विजेतेपद (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून सलग दुसर्‍या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.(Punit Balan Group (PBG) – Friendship Cup)

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर (LR Shinde High School Ground) झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर संघाने विजेतेपद साकार केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना साई पॉवर हिटर्सने ९२ धावांचे लक्ष्य उभे केले. ४ गडी बाद ३१ धावा असा संघ अडचणीत सापडलेला असताना संघाच्या हुमेद खान याने ४५ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. कर्णधार श्रीधर मोहोळ याने २५ धावा करून हुमेद याला उत्तम साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ३३ चेंडूत ६८ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा डाव ५५ धावांवर मर्यादित राहीला. साई संघाच्या हुमेद खान याने ११ धावात ४ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन (Punit Balan) आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या (Manikchand Oxyrich) संचालिका जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal-Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik), दिक्षीत मोटर्सचे श्रेयस दिक्षीत (Shreyas Dixit), मोहनदादा जोशी (Congress Leader Mohan Joshi), पुणे पत्रकार संघाचे (Pune Shramik Patrakar Sangh) अध्यक्ष पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor), नितीन पंडीत, कुमार रेणूसे, योेगेश शांडिल्य, गगनदीप ओबोरॉय, शिरीष मोहीते, अनिल सपकाळ, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.

यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांच्यावतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

विजेत्या साई पॉवर हिटर्स संघाला २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या रूपक तुबाजी याला ५१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज- कपिल राऊत, सर्वोत्कृष्ट गोलंदाज- हुमेद खान, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- आदित्य अष्टपुत्रे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- प्रथमेश गोवकर या सर्व खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आला. फेअर प्ले पुरस्कार तुळशीबाग टस्कर्स आणि मीडिया रायटर्स या दोन संघांना देण्यात आला.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः

साई पॉवर हिटर्सः १० षटकात ७ गडी बाद ९२ धावा (हुमेद खान ४५ (२५, ६ चौकार, २ षट कार), श्रीधर मोहोळ २५, रूपक तुबाजी २-२६) वि.वि.

शिवमुद्रा ब्लास्टर्सः १० षटकात ९ गडी बाद ५५ धावा (रोहीत खिलारे ११, तुषार आंबट १०, हुमेद खान ४-११, निखील वाटणे १-२); सामनावीरः हुमेद खान;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | पिंपरी ड्रग्ज प्रकरणात पोलिस अधिकार्‍याला अटक, आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता; प्रचंड खळबळ