Yo Yo हनी सिंगचं नवं गाणं ‘मखना’त महिलांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर, राज्य महिला आयोगाकडून नोटीस

मुंबई : वृत्तसंस्था –  प्रसिद्ध रॅपर हनी सिंगला पंजाब राज्य महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे. आयोगाने हनी सिंगला त्याचे नवीन गाणे ‘मखना’ मध्ये महिलांवर वापरेल्या शब्दांसाठी नोटीस केली आहे. गाण्यामध्ये महिलांवर टिका करणारा हनी नेहमी निशाण्यावर असतो.

पंजाब राज्य महिला आयोगाचे चेअरमन मनीषा गुलाटी यांनी दिलेल्या माहितीनूसार, या गाण्यामध्ये हनी सिंग स्वतःला ‘वूमेनाइजर’ म्हणून महिलांच्या चारित्र्यावर अपमानजनक टिका करत आहे. या कारणामुळे हनी सिंगला नोटीस पाठविले आहे त्याचबरोबर याचे उत्तर मागितले आहे.

आपले गाणे ‘मखना’सोबत हनी सिंगने पुन्हा एकदा आपली जादू प्रेक्षकांवर केली आहे. त्याचे प्रत्येक गाणे धुमाकूळ घालते. २१ डिसेंबरला ‘मखना’ गाणे टी-सीरीजला प्रदर्शित झाले. चाहत्यांनी या गाण्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता.

यो यो हनी सिंगने आपले चार्टबस्टर गीत ‘दिल चोरी’ साठी मुंबईमध्ये आयोजित हालिया संगीत पुरस्कारमध्ये ‘सॉन्ग ऑफ द ईयर’ पुरस्कार प्राप्त केला होता. २०१८ वर्ष हनी सिंगसाठी शानदार होते.
यामध्ये ‘दिल चोरी’ आणि ‘छोटे छोटे पेग’, ‘दिस पार्टी इज ओवर नाउ’, ‘रंगतारी’पासून शाहिद कपूर-कियारा आडवाणीपर्यंत अनेक गाण्यांवर त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

इंडियन म्यूजिक इंडस्ट्रीमधून यश मिळवणारा हनी सिंग व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याला अनेकदा गाणे प्लॉप झाल्याचा सामना करावा लागला. त्यामुळे तो अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होता. आता तो हळूहळू आपले मन स्थिर ठेवत आहे. त्याचे गाणे मखना काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाले.

एका मुलाखतीत हनी सिंग म्हणाला की, ‘ज्या वेळी मी ब्रेक घेतला होता त्यावेळी मी कोणत्याच प्रकारचे म्यूजिक कंम्पोज करु शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये माझ्या परिवाराने मला खूप सपोर्ट केला. यामुळे मी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आलो. माझ्या जीवनात माझ्या पत्नीचे मोठे योगदान आहे. ज्यावेळी मी खूप डिप्रेशनमध्ये होतो त्यावेळी माझ्या पत्नीने मला खूप सपोर्ट केला.’

केवळ पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ‘तुळस’ आहे उपयुक्त

 चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन