‘उडता पंजाब’ ! एकाच गावातील १६ तरुण HIV आणि HCV बाधित आढळल्याने प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमध्ये ड्रग्जच्या विळ्ख्यानंतर आता नवीन व्हायरस समोर आला आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील १६ तरुणांमध्ये एचआयव्ही आणि एचसीव्ही व्हायरस आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. एका १७ वर्षीय मुलाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असताना त्याची रक्त तपासणी करताना ही घटना उघडकीस आली. मेडिकल रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. त्या युवकाने दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याचे २० साथीदार एकाच सुईने ड्रग्जचे सेवन करत होते. त्यानंतर या तरुणांचे रक्त तपासले असता त्यातील ८ युवक एचआयव्ही आणि एचसीव्ही  बाधित आढळले. माहिती लीक झाल्यानंतर आता प्रशासन आणि युवकांचे कुटुंबीय ही माहिती दडवण्याचे काम करत आहेत.

image.png

संक्रमित सुयांद्वारे पसरले विषाणू 

स्थानिक आणि एचआयवीग्रस्त युवकांच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पद्धतीने आजार पसरणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असू शकते. त्यामुळे या घटना दाबण्याचा प्रयत्न  काँग्रेस सरकार आणि स्थानिक प्रशासन करत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर एकाच दिवसात १७ जणांवर ड्रग्ज घेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेक युवकांना नशामुक्ती केंद्रात भरती करण्यात आले आहे.

या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात लोकांची सरकार आणि प्रशासनावर नाराजी दिसून येत आहे. त्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीने या गावात केलेल्या पाहणीत आढळून आले की, संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या बाटल्या आणि सुया पडलेल्या होत्या. गावातील तरुण यांचाच वापर करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत आहेत.

काँग्रेस सरकारचे अपयश 

सत्तेवर येण्याआधी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आम्ही चार आठवड्यांत याठिकाणी ड्रग्जवर आळा घालण्याचे काम करून याला मुळासकट उपटून टाकू असे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर देखील या ठिकाणी ड्रग्जला आळा बसला नाही तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे जनता काँग्रेस सरकारला यासाठी जबाबदार ठरवत आहे.

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

Loading...
You might also like