PVC Aadhaar Card मागवणं झालं एकदम सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं कार्ड; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PVC Aadhaar Card | भारतातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड अनिवार्य आहे. कोणत्याही खासगी (Private) किंवा शासकीय कामासाठी (Government Work) आधार कार्ड क्रमांक मागितला जातो. ओळखपत्र (Identity Card), अ‍ॅड्रेस प्रूफ (Address Proof) म्हणून आधार कार्ड गरजेचं आहे. त्यामुळे अनेकजण आधार कार्ड जवळ बाळगतात. आधार कार्ड सोबत असले तरी ते हरवण्याची भीती असते. त्यामुळे अशावेळी PVC Aadhaar Card वापरणे फायद्याचं ठरतं.

 

पोलिविनाईल क्लोराईड (PVC) कार्ड ATM किंवा Credit Card प्रमाणे दिसतं. त्यामुळे हे सहजपणे आपल्या खिशात, वॉलेटमध्ये ठेवणं सोपं जात. घरबसल्या आपल्या मोबाईलच्या मदतीने पीव्हीसी आधार कार्ड मागवता येते यासाठी UIDAI ने महत्त्वाची माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे.

 

 

एका मोबाईल नंबरवरुन तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करु शकता. सहजपणे संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीचे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन मागवता येईल. यासाठी 50 रुपये खर्च येतो. यात स्पीड पोस्टचा (Speed Post) खर्चही जोडलेला आहे. हे कार्ड मागवण्याची पद्धतही सोपी आहे.

 

असे मागवा PVC Aadhaar Card

सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in ओपन करा.

त्यानंतर My Aadhaar Section मध्ये Order आधार पीव्हीसी कार्ड वर क्लिक करा.

Order Aadhaar PVC Card वर क्लिक केल्यानंतर 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी वर्च्युअल आयडी (Virtual ID) अथवा 28 अंकी EID टाकावा लागेल. या तीनपैकी कोणताही एक नंबर टाकू शकता.

आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड (CAPTCHA Code) टाका किंवा Send OTP वर क्लिक करा.

रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

आता PVC Card Preview कॉपी येईल. इथे आधारचे डिटेल्स ही दिसतील.

जर तुमचा मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर्ड नसेल, तर Request OTP समोर असलेल्या एका ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टकून Send OTP वर क्लिक करा.

OTP आल्यानंतर शेवटी पेमेंट ऑप्शन येईल. याठीकाणी 50 रुपये जमा करावे लागतील.
त्यानंतर आधार PVC ऑर्डर होईल. ऑर्डर झाल्यानंतर 15 दिवसात स्पीड पोस्टने आधार कार्ड तुमच्या घराच्या पत्त्यावर येईल.

 

Web Title :- PVC Aadhaar Card | how to order pvc aadhaar card on one order check process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा