PVR ची फिल्ममेकर्सला विनंती – ‘थिएटर उघडण्याची प्रतिक्षा करावी’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांचा गुलाबो सिताबो आणि विद्या बालनचा शकुंतला देवी हा सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्यात येणार आहे अशी माहिती नुकतीच समोर आली होती. यानंतर आता अनेक थिएटर मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये थिएटर बंद असल्यानं मेकर्सचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळं त्यांनी आपला मोर्चा ऑनलाईनकडे वळवला आहे.

या सगळ्यानंतर आता पीव्हीआर सिनेमाजनं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सिनेमे रिलीज होत आहेत हे पाहून एक स्टेटमेंट जारी केलं आहे. यातून त्यांनी मकर्सना विनंती केली आहे की त्यांनी थिएटर सुरू होईपर्यंत वाट पहावी.

पीव्हीआरनं आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं की, “आम्हाला असं वाटतं की, फिल्मकाराची मेहनत दाखवण्याचा सर्वात चांगला मार्ग हा आहे की, सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये दाखवला जावा. कोरोनामुळं थिएटर फक्त भारतातच नाही तर जगभरात बंद आहेत. आम्हाला विश्वस आहे जेव्हा सगळं काही ठिक होईल तेव्हा पुन्हा चाहेत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतील.”

यात पुढं असं म्हटलं आहे की, आम्ही प्रोड्युसर्सना विनंती करतो की, त्यांनी थिएटर सुरू होईपर्यंत सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्याला स्थगिती देण्याच्या विनंतीवर विचार करतील.”