भारत-पाक आशिया चषक; १९ सप्टेंबरच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे आख्या देशातील क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाचा असतो. येणारा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील भारत -पाक दरम्यानचा  सामना १९ सप्टेंबरला होणार नसल्याचे सूत्रांची सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील क्रिकेट संघ बऱ्याच कालावधीनंतर आशिया चषकाद्वारे आमने सामने येणार आहे. पण आता हा सामना १९ सप्टेंबरला खेळवता येऊ नये याकरिता प्रयत्न केले जात आहेत. या गोष्टीला कारण ठरते आहे ते आशिया सोर्धेचे वेळापत्रक.
[amazon_link asins=’B079R1JS6K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55391ac4-91af-11e8-a26d-6be43757f258′]

आशिया चषक स्पर्धेत भारत -पाक सामना १९ सप्टेंबर ला होणार आहे. मात्र १८ सप्टेंबरला भारताचा सामना असून त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना कसा खेळेल? हा सर्वात मोठा पेच आहे. याबाबत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
याबाबतीत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आशिया चषकाच्या कार्यक्रमावर टीका केली. त्यांनी सांगितले की, ” आशिया चषकामधील सामने ठरवताना डोक्याचा वापर केला गेलेला दिसत नाही. कोणताही संघ लागोपाठ दोन सामने कसे खेळू शकतो. या सामन्यासाठी भारताला विश्रांती नाही, तर पाकिस्तानला दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. ही गोष्ट कोणालाही पटण्यासारखी नाही. त्यामुळे १९ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना होण्याची शक्यता कमी आहे.”