R Madhavan-Pune FTII | चित्रपट उद्योगात सर्जनशील व दर्जात्मक काम करावे, FTII चे नवे अध्यक्ष आर. माधवन

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – R Madhavan-Pune FTII | उत्साह टिकवून ठेवत चित्रपट उद्योगात कायमच सर्जनशील आणि दर्जात्मक काम केले पाहिजे, अशी अपेक्षा एफटीआयआयचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आर. माधवन यांनी व्यक्त केली. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच आर. माधवन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये आले होते. दोन दिवसांच्या भेटीदरम्यान त्यांनी प्राध्यपक व कर्मचाऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. आर. माधवन यांनी विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच गुरुवारी स्टुड्ंस असोसिएशनच्या विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा केली. अध्यक्षांच्या येण्यामुळे कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण होते. (R Madhavan-Pune FTII)

याशिवाय त्यांनी विभाग प्रमुख आणि एफटीआयआय कर्मचारी संघटनेच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
यावेळी त्यांनी ओपन लर्निंग वर्टिकल, सेंटर फॉर ओपन लर्निंग अंतर्गत 450 हून अधिक शार्ट कोर्स यशस्वीपणे
घेतल्याबद्दल एफटीआयआय प्रशासनाचे कौतुक केले. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून
समुदायातील विद्यार्थ्यांसाठी भारतभर मोफत लहान अभ्यासक्रम घेतले जात असल्याबद्दल आर. माधवन यांनी आनंद व्यक्त केला. (R Madhavan-Pune FTII)

ADV

पायाभूत सुविधांसह शैक्षणिक प्रश्नांबाबत आर. माधवन यांनी एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनसोबत चर्चा केली.
FTII मधील विविध गोष्टींमध्ये कायम सहभाग असवा, त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा यावेळी
व्यक्त केली. आर माधवन यांनी असोसिएशनचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे आश्वासन दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Maharashtra Govt | ‘पेशंट टेबलावर आणि डॉक्टर दौर्‍यावर असा उथळ कारभार सध्या सुरु’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात (व्हिडिओ)