संगीतकार ए. आर. रहमानच्या ‘या’ पोस्टने चाहत्यांना “याड लावलयं, तासाभरात 1.5 लाखावर Likes

पोलीसनामा ऑनलाईन – अख्खा जगाला वेड लावणारा संगीतकार ए. आर. रहमान ( Musician AR Rahman ) याने शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. अगदी तासाभरात या पोस्टला 1.5 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. कमेंट्सचाही जणू पाऊस पडत आहे.

आता या पोस्टमध्ये असे काय आहे, तर रहमानने स्वत:चे एक स्केच शेअर केले आहे. रहमानच्या एका चाहत्याने तामिळ लिपीचा वापर करून त्याचे हे स्केच काढले आहे. रहमानला हे स्केच इतके आवडले की, त्याने ते त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केले आणि बघता बघता ते तुफान व्हायरल झाले. लोकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. ए. आर. रहमानचे हे स्केच मुळातच कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. विशेष म्हणजे, रहमानने संगीत दिलेल्या गाण्यांची नावे वापरून रेखाटले आहे. तारिक अजीज याने ही सुंदर कलाकृती रेखाटली आहे. तामिळ कॅलिग्राफीचा मोठ्या खुबीने वापर करत, त्यात अधिक जिवंतपणा आणण्यासाठी काही रेषांचा देखील वापर केला आहे.

अवघ्या एका तासात 1.5 लाखांवर लाईक्स
रेहमान यांनी हे चित्र पोस्ट करताच केवळ एक तासातच चित्राला 1.5 लाखांवर लाईक्स मिळाले. अनेक या स्केचचे कौतुक केले. तामिळ टायपोग्राफीच्या निर्मात्यांनी ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ असे टॅग करीत त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकांऊटवरून हे चित्र शेअर केले. तेथे देखील चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सची बरसात केली आहे.

एका मध्यमवर्गीय तामीळ मुदलियार परिवारात रहमानचा जन्म झाला. आईवडिलांनी दिलीप कुमार असे त्याचे नाव ठेवले. त्याचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. रहमानचे वडिल दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळे मुलाचा जन्म झाला त्यावेळी त्यांनी त्याचे नाव त्यांनी ए. एस. दिलीप कुमार ठेवले होते. पण पाळण्यातले हे नाव रहमानला कधीच मनापासून आवडले नाही. पुढे रहमानने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला.