Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar | मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पुन्हा इशारा, ”रोहित पवारांवर गुन्हा दाखल होणारच”

अहमदनगर : Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar | तलाठी भरतीबाबत (Talathi Bharti) बेताल वक्तव्ये त्यांनी केली. पण जाहीर पुरावे मांडले नाहीत. आजोबांची परंपरा चालवण्याचे लायसन्स मिळाले आहे काय? बोलताना भान ठेवले पाहिजे. त्यामुळे आमदार पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे, असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना दिला आहे. (Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar)

नगरमध्ये आयोजित महानमो रोजगार मेळाव्याच्या उदघाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. यावरून रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या इशारा विखे यांना दिला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा त्याचा पुनरूच्चार केला.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणाले, कोणतेही पुरावे न देता बेताल आरोप केल्याने त्याबाबत गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली आहे.

कोणाचा नातू म्हणून काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेले नाही. आजोबाची परंपरा नातवाने चालवल्याचे दिसते.
असे म्हणत विखे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले.

Prakash Ambedkar On Pune Lok Sabha | जालन्यातून जरांगेंना तर पुण्यातून डॉ. वैद्य यांना उमेदवारी द्या, ‘वंचित’ची मविआ बैठकीत मागणी, दिले ‘हे’ 4 प्रस्ताव

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक