Radhakrishna Vikhe Patil | ‘ चंद्रकांतदादांना नाही, मात्र, राधाकृष्ण विखे आणि हर्षवर्धन पाटील यांना मिळाली अमित शहांची भेट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील चार दिवसापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दिल्लीत ठाण मांडून होते. परंतु त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घडून आली नाही. पण भाजपचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना मात्र मंगळवारी (10 ऑगस्ट) रोजी अमित शाह यांची भेट झालीय. या भेटीत सहकार क्षेत्राविषयी चर्चा झाली. नव्या सहकार मंत्रालयामार्फत (Ministerio de Cooperación) काय काय करता येऊ शकते यावर भेटीत चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तर, भेट न मिळाल्याने चंद्रकांतदादा यांच्यासह दिल्लीला (Delhi) गेलेले नेते कालच मुंबईत रिटर्न आलं आहेत. दरम्यान, दिल्लीत मात्र विखेंची शहा यांच्याशी भेट झाल्याने पाटील यांना भेट नाकारली गेल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

EPF दर महिन्याला पैसे जमा केल्यास देते 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त, केवळ करावे लागेल ‘असं’ प्लॅनिंग; जाणून घ्या

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे चार दिवसाआधी माजी मंत्री राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय यांच्यासोबत दिल्लीला गेले होते. चार दिवस तेथे थांबून त्यांनी पक्षाचे नेते, मंत्री यांची भेट घेतली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली नाही. त्यामुळे पाटील कालच मुंबई रिटर्न आलेत. दरम्यान, मुंबईमध्ये माध्यमांशी सवांद साधतेवेळी त्यांनी अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्याने पंतप्रधान मोदी आणि शाह यांची भेट झाली नाही. असं सांगून शहा यांनी भेट नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, मंगळवारीच (10 ऑगस्ट) रोजी राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी
अमित शाह यांची भेट घेतली आहे. अमित शाह यांच्याकडे नवीन केंद्रीय सहकार मंत्रालयाचा
(Ministerio de Cooperación) कारभार हाती आल्यांनतर विखे पाटील यांनी प्रथमच भेट
घेतली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील भाजपच्या सहकारी साखर कारखानदारीतील
नेत्यांची विखे यांच्या पुढाकारातून नगरच्या विळद घाट येथील विखे पाटील फाउंडेशनमध्ये बैठक
झाली होती. या पार्श्वभूमीवर चर्चा झालेला प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना दिला. या दरम्यान, केंद्रीय सहकार
मंत्रालय स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सहकारातील आणि राज्यातील
अन्य नेत्यांनी देखील शाह यांची भेट घेतली. तसेच आता विखे पाटील यांनी भेट घेतली आहे.
सहकार चळवळीला चालना देण्यासाठी काय करायला हवे याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे म्हटले आहे. विखे पाटील यांनी याबाबतचे एक लेखी निवेदन देखील शहा यांना दिले आहे.

हे देखील वाचा

Vitamin D Benefits | तणाव दूर करण्यासाठी खुप महत्वाचे आहे ‘व्हिटॅमिन डी’ चे सेवन, जाणून घ्या 10 फायदे आणि सेवनाची पद्धत

Pune Crime | बजाज फायनान्सलाही सायबर चोरट्यांचा ‘झटका’; कंपनीच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याने व्यवसायाला ‘फटका’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Radhakrishna Vikhe Patil | union home minister amit shah met radhakrishna vikhe patil and Harshvardhan Patil instead of chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update