अभिनेत्री राधिका आपटे पिण्याच्या पाण्यासाठी चक्क दिवसाला करते ‘एवढा’ खर्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कपड्यांवर हजारो खर्च करणारे सेलेब्रिटीज तुम्ही पाहिले असतील परंतु पाण्यासाठी दिवसाला हजारो रुपये खर्च करणारे सेलेब्रिटी तुम्ही नक्कीच पाहिले नसतील. अशी एक अभिनेत्री आहे जी दिवसाला पिण्याच्या पाण्यावर 4000 रुपये खर्च करते. स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी ती हे सगळं करते.

पिण्याच्या पाण्यावर दिवसाला 4000 रुपये खर्च करणारी ही अभिनेत्री आहे राधिका आपटे. राधिका आपटे आपल्या बोल्डनेस मुळे अनेकदा चर्चेत आली आहे. बोल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून राधिका आपटेचं नाव घेतलं जातं. स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी राधिका पिण्याच्या पाण्याची खूप काळजी घेते. बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी ती खूप काळजी घेते. राधिका पित असलेलं हे पाणी साधं पाणी नाही तर बेरोका वॉटर आहे. याशिवाय ती दुसरं कोणतंच पाणी पित नाही.

बेरोका व्हिटॅमिन टॅब्लेट्स आहेत ज्याची किंमत सुमारे 4000 रुपये आहे. महिन्याला ती बेरोका वॉटरसाठी 1 लाख 20 हजार रुपये खर्च करते. बेरोका एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. या कंपनी अंतर्गत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी टॅब्लेट्स बनवल्या जातात. या टॅब्लेट्स ऑरेंज, बैरी आणि मँगो-ऑरेंज फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत.

राधिका स्वत:ला मेंटन ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. तेलापासून बनवलेले पदार्थ ती अजिबात खात नाही असं म्हणत तिनं आपल्या सेक्सी फिगरचं सिक्रेट सांगितलं आहे. राधिका खास डाएट फॉलो करते. काही दिवसांपूर्वी राधिका आपल्या बिकीनी लुकमुळेही चर्चेत आली होती.