Radhika Madan | गर्भनिरोधक गोळ्या घेऊन पूर्ण करावं लागलं शूटिंग; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Radhika Madan | चंदेरी दुनीया लांबून जेवढी ग्लॅमरस वाटते तेवढी जवळून तिचे वास्तवही खूपच भयानक आहे. या इंडस्ट्रीत (Bollywood industry) कलाकारांना एक संधी मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो. त्यात जर तुम्हाला कोणी गॉडफादर (Godfather) मिळालाच तर संधी मिळणं थोडं सोपं होतं. मात्र जर गॉडफादर नसेल तर चंदेरी दुनियेत स्ट्रगल (Struggle) करावेच लागते. जर एखाद्याने संधी दिली तर नवीन कलाकार मिळालेल्या संधीचं सोनं करतात. स्वत:च्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करतात. अशाच एका अभिनेत्रीपैकी एक आहे राधिका मदान (Radhika Madan).

 

राधिकाने (Radhika Madan) मोठ्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकदा तिलाही रिजेक्शनचा (Rejection) सामना करावा लागला. एवढंच काय तर ती सुंदर दिसत नाही असे म्हणत तिला नाकारण्यात देखील आले. मागे वळून पाहताना भूतकाळातील काही गोष्टी राधिकाला विसरणंही अशक्यच आहे. तिने एका मुलाखती इंडस्ट्रीत कशा प्रकारे संघर्ष करावा लागला याचा खुलासा केला होता.

 

मला पहिल्या शॉटसाठी गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pills) घेण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्याच वेळी माझे आई-वडील मला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीत येत होते. तेव्हा माझ्या वडिलांनी त्या गोळ्या पाहिल्या तेव्हा त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. त्यांनी कधीही कल्पना आणि विचारही केला नसेल. राधिकाने सांगितले, मी पण आतून खूप घाबरले होते. पण नंतर सगळं काही ठिक झालं आणि मला वाटले की शूटिंगनंतर (shooting) सर्वजण माझ्या पहिल्या शॉटचे कौतुक करतील. पण त्यावेळी असे काही झाले नाही.

 

 

‘मेरी आशिकी तुमसे ही’ या टेलिव्हिजन शोमधून राधिकाने (Radhika Madan) आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
छोटा पडदा गाजवल्यानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली.
यानंतर विशाल भारद्वाजच्या (Vishal Bhardwaj) ‘पटाखा’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते.
खरंतर राधिकाचा डेब्यू ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटातून होणार होता.
कारण या चित्रपटाचे शूटिंग तिने ‘पटाखा’च्या पूर्वीच पूर्ण केले होते.

 

राधिका ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) याच्यासोबत दिसली होती.
हा चित्रपट फक्त काही स्क्रीनवर प्रदर्शित झाला.
त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) जास्त काही कमाल करु शकला नाही.
दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) सोबत ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती.
तिच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते.

 

Web Title :- Radhika Madan | shocking revelation actress radhika madan behind her taking contraceptive pills her first film shooting marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | किमान पेन्शन आणि व्याजदरावर आज येणार निर्णय ! 3000 रुपये होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या सविस्तर

Rohit Sharma Records | अफलातून ‘हिटमॅन’ ! रोहित शर्मानं केली विराट अन् बाबरची बरोबरी, एकाच मॅचमध्ये केलं ‘हे’ 6 मोठे रेकॉर्ड

Body Polishing Tips | नॅचरल प्रॉडक्टने घरातच करा बॉडी पॉलिशिंग, जाणून घ्या फायदे आणि पद्धत