Body Polishing Tips | नॅचरल प्रॉडक्टने घरातच करा बॉडी पॉलिशिंग, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Body Polishing Tips | शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी बॉडीवर पॉलिशिंग करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. बॉडी पॉलिशिंगने डेड सेल्स दूर होतात, तसेच रंगात सुधारणा होते. याद्वारे शरीराचा थकवा कमी करता येऊ शकतो. सोबतच त्वचा मुलायम आणि चमकदार सुद्धा बनवता येऊ शकते. बॉडी पॉलिशिंग (Body Polishing Tips) तुम्ही घरात सुद्धा करू शकता. यासाठी केमिकलऐवज नॅचरल प्रॉडक्टचा वापरू शकता. ब्राऊन शुगर आणि जोजोबा ऑईल बॉडी पॉलिशिंगसाठी उत्तम आहे.

 

ब्राऊन शुगरचे त्वचेसाठी फायदे

ब्राऊन शुगर त्वचा एक्सफोलिएट करते.

मध मिसळून स्क्रब केल्याने मृत त्वचा काढण्यास मदत होते.

 

जोजोबा ऑईल कसे आहे परिणामकारक :

जोजोबा ऑईलमधील केमिकल कंपाऊंड त्वचेला हायड्रेट करते.

याच्या वापराने त्वचा चांगली मॉयस्चराईज ठेवण्यात मदत मिळते.

 

बॉडी पॉलिशिंगसाठी घरात तयार करा स्क्रब

साहित्य : 1 कप ब्राऊन शुगर, 2 चमचे जोजोबा ऑईल, अर्धा कप मध

 

कसे करावे बॉडी पॉलिशिंग :

बॉडी पॉलिशिंगसाठी सर्वप्रथम एका वाटीत ब्राऊन शुगर आणि मध मिसळून पेस्ट बनवा.

ही पेस्ट 5 मिनिटांसाठी वाटीत राहू द्या.

पेस्ट चांगली मिसळून बॉडी स्क्रबसाठी वापरा.

स्क्रब शरीरावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

थोड्या वेळानंतर कोमट पाण्यात कॉटन भिजवून त्वचा स्वच्छ करा.

स्क्रब केल्यांनंतर जोजोबा ऑईलचा वापर बॉडी पॉलिशिंग म्हणून करू शकता.

महिन्यात एकवेळ बॉडी पॉलिशिंग केल्याने चेहर्‍याप्रमाणे तुमची बॉडीसुद्धा चमकदार होईल. (Body Polishing Tips)

 

Web Title :- Body Polishing Tips | how to do body polishing at home step by step know the benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shani Dev Shap Katha | ‘या’ कारणामुळे शनिदेवाला त्यांच्या पत्नीने दिला होता भयंकर शाप, जाणून घ्या पौराणिक कथा

Gopichand Padalkar | शरद पवारांचा ST च्या जागेवर डोळा म्हणून खासगीकरणाची चर्चा, गोपीचंद पडळकरांचा ‘हल्लाबोल’